
पुण्यातील नारायण पेठेत दोन गटांमध्ये बोर्ड लावण्यावरून हाणामारी झाली होती. यात कोयत्यानं वार केल्यानं एका गटातले दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी आता पुण्यातील काँग्रेस नेते गोपाल तिवारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गोपाल तिवारी यांच्यासह सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.