

Pune Graduate Election Controversy harshada deshmukh
esakal
Pune Graduate Election Counting : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच मतमोजणी केंद्रातील व्यवस्थेवरून वाद निर्माण झाला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात पेन आणि कागद घेऊन जाण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जात असल्याची तक्रार प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.