

Pune Graduate Election Result Vote Counting
esakal
Pune Graduate Constituency Result : चुरशीने झालेल्या पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ही मतमोजणी प्रक्रिया होत आहे. दोन्ही मतदारसंघांतील निकाल जाहीर होण्यास २४ तासांचा कालावधी लागेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, पदवीधरसाठी पहिल्या टप्प्यातील कौल दुपारनंतर समोर येणार आहे.