Shirur Election Result 2021 : शिरूरमध्ये काय आहे निवडणूक निकालाचे चित्र; वाचा सविस्तर

shirur
shirur

- चिंचोली मोराची ता. शिरुर येथे सदस्य संख्या 9 आसणारी ग्रामपंचायत यामुळे 9 जागेवर निवडणूक लागली होती.

विजयी उमेदवार - 1 ) राहूल शिवाजी नानेकर 2 ) विमल अर्जून नानेकर 3) आश्वीनी विजय मोहिते 4) अशोक ठकूजी गोरडे 5 ) रुपाली मच्छिंद्र धूमाळ, 6) चैञाली सचिन गोरडे, 7) स्मिता गुलाबराव धुमाळ, 8) संतोष बाळासाहेब भोसले, 9) सुमन शिवाजी नानेकर माजी सरपंच स्मिता गुलाब धुमाळ या पुन्हा या पंचवार्षिक साठी निवडून आल्या आहेत.

उरळगाव (ता. शिरूर) ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत माजी सरपंच सुनील सात्रस, अशेाक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे ९ जन विजयी झाले . त्यामुळे या पॅनलने  निर्विवाद बहुमत प्राप्त केले. श्री विठू माऊली ग्रामविकास पॅनलचे  फक्त दोन उमेदवार निवडून आले. उरळगाव ग्रामपंचायत एकूण अकरा  सदस्य आहेत. त्यामध्ये श्री विठू माऊली ग्रामविकास पॅनल व जनसेवा ग्रामविकास परिवर्तन पॅनल या राष्ट्रवादीच्या दोन गटात सरळ दुरंगी सरळ लढत झाली. मात्र प्रभाग क्रमांक तीन मधील सर्वसाधारण जागेसाठी फक्त तिरंगी लढत होती. त्यामुळे येथील निवडणुकीचे  तालुक्याचे लक्ष लागले होते. जनसेवा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच सूनील सात्रस, माजी उपसरपंच अशोक चव्हाण, माजी सरपंच प्रभाकर जांभळकर, भानुदास चव्हाण, संजय जांभळकर, सागर कोळपे आदींनी केले. जनसेवा ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे -

रफिक महंमद शेख ,स्वाती शशिकांत कोकडे, निकिता मोहन सात्रस, अशोक नारायण चव्हाण, भाग्यश्री अमोल होलगुंडे, स्वप्निल साहेबराव गिरमकर, लंका सचिन पाचुंदकर, शकुंतला भिवाजी काळे, सारिका गजानन जांभळकर.  

विरोधी श्री विठू माऊली ग्राम विकास पॅनल चे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे -

अशोक बबनराव कोळपे, राणी सोमनाथ बांडे.  पॅनल प्रमुख व सर्व विजयी उमेदवारांचे आमदार अॅड. अशोक पवार यांनी अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  मंडल कृषी अधिकारी सुवर्णा विजय आदक व ग्राम विकास अधिकारी शितल थिटे यांनी काम पाहिले. येत्या काळात  आमदार अॅड. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या हिताची अधिकाधिक विकास कामे करण्याचा प्रयत्न करणार आहे असे पॅनल प्रमुख सुनिल सात्रस तसेच नवनिर्वाचित सदस्यांनी सांगितले.

टाकळी हाजी, ता. 18 -  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सोमवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. मतमोजणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होत असून, अंतिम निकाल दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत जाहीर होतील, असा अंदाज आहे. 
शिरुर तालुका ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजता सुरु झाली. अगदी काही वेळातच पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे घोषणाबाजी सुरू झाली होती. महसूल प्रशासनाने नियोजन करून प्रशासन व उमेदवारांना आतमध्ये प्रवेश दिला.

अपडेट्स : 

शिंदोडी ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर केला आहे. 

विजयी उमेदवार :

१) राखी शिवम वाळुंज.

२) सिंधु इंद्रभान ओव्हाळ.

३) अरुण दौलत खेडकर.

४) रेश्मा रविंद्र वाळुंज.

५) कमल भगवंत वाळुंज.

६) संजय गजाबा धुळे.

७) गौतम मारुती गायकवाड.

हेही पहा - शिरुर तालुका ग्रामपंचायत मतमोजणीस सुरवात


- मिडगुलवाडी ता. शिरुर  ग्रामपंचायतीच्या 7 सदस्यसंख्या असणाऱ्या या निवडणूकीत दोन जागा बिनविरोध तर 5 जागांसाठी निवडणूक लागली होती. या निवडणूकीत सतीष इचके, प्रभावती मिडगुले, निता कोळेकर, संध्या मिडगुले, व राहूल मिडगुले विजयी झाले आहेत. संध्या मिडगुले व स्वाती मिडगुले यांच्यात 107 मतदान पडल्याने बरोबरी झाली होती . चिठ्ठी काढून संध्या मिडगुले यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. भैरवनाथ पॅनल विजयी झाल्याचे सांगण्यात आले. या निवडणूकीत वर्षा पिंगळे व देव मिडगुले बिनविरोध निवडून आहले आहेत. सध्या मिडगुले माजी सरपंच आहेत. 

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या चार हजार 904 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 लाख 18 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. जिल्ह्यात मतदान 80.54 टक्‍के झालेले आहे. जिल्ह्यातील उर्वरित 95 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. 
जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये 649 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी 21 हजार 359 उमेदवारांनी एकूण 21 हजार 771 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आठ हजार 778 जणांनी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे 11 हजार 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पुरंदर तालुक्‍यातील पिंगोरी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.  सोमवारी (ता. 18) तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणी सुरुवात झाली. अंतिम निकाल दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत जाहीर होतील अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली.

आलेगाव पागा येथे श्री भैरवनाथ ग्रामविकासला बहुमत          

रांजणगाव सांडस : आलेगाव पागा (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका छाया बेनके, आप्पासाहेब बेनके, सुभाष भोसले, चंद्रकांत श्रीगिरीअण्णा यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने अकरापैकी  सात जागांवर विजय मिळवत या गावामध्ये या गटाकडे असणारी पंचवीस वर्षाची पंचायतीची सत्ता यावेळीही कायम राखली.

विरोधी पॅनलचे बाळासाहेब वाघचौरे, प्रा. भाऊसाहेब भोसले,  यांच्या नेतृत्वाखालील श्री भैरवनाथ शेतकरी ग्रामविकास पॅनेल   ४ जागांवर समाधान मानावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com