पुणे : निर्यातीला चालना : राज्य कृषी पणन मंडळाच्या प्रयत्नांना यश

जर्मनी द्राक्षे, आले, लिंबू, आंब्याच्या प्रेमात!
Pune grapes ginger lemon mango Exports Germany
Pune grapes ginger lemon mango Exports Germanysakal

पुणे : जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून प्रथमच आयात केलेल्या अंजिराच्या गोडीला जर्मनीतील ग्राहकांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे. महाराष्ट्रातील आले, लिंबू, द्राक्षे व आंबा आयातीसाठी जर्मनीतील कंपनी उत्सुक झालेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतमाल निर्यातीच्या वाढीसाठी राज्य कृषी पणन मंडळ करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे.

पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी पणन मंडळाच्या निर्यातविषयक पायाभूत सुविधा जसे वाशी येथील विकीरण सुविधा केंद्र, व्हेपर हीट ट्रीटमेंट व भाजीपाला प्रक्रिया केंद्र येथून अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व युरोप येथे होत असलेल्या निर्यातीची माहिती दिली.

केंद्र सरकारच्या कृषी निर्यात धोरणाच्या आधारे महाराष्ट्र राज्याचे कृषी निर्यात धोरण तयार करण्यात आले असून कृषी निर्यात धोरणामध्ये समाविष्ट करण्यात येत असलेले क्लस्टर्स आणि त्याअंतर्गत प्रस्तावित असलेली विविध कामे याबद्दल चर्चा झाली. या वेळी कंपनीचे बंगळूर येथील प्रतिनिधी मधू कल्यपुरा मुनिकृष्णाप्पा, पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रोहन उरसळ, पणन मंडळाचे निर्यात व्यवस्थापक शैलेश जाधव, जितेंद्र जगताप, विराज पाटील हे अधिकारी उपस्थित होते.

अंजिरास सकारात्मक प्रतिसाद : गेल्या महिन्यात कृषी पणन मंडळाच्या साहाय्याने प्रायोगिक तत्त्वावर जर्मनीत अंजीर आयात केले होते. याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पणन मंडळाच्या सहकार्याने ज्या कृषिमालास युरोपियन देशांत आणि अमेरिका येथे निर्यातीच्या संधी आहेत, त्या कृषिमालाच्या निर्यातीबाबत कामकाज करण्याची तयारी असल्याचे डॉन लिमन कंपनीचे प्रतिनिधी अँड्रियास शिंडलर यांनी सांगितले.

बैठकीत काय घडले?

  • भारत व युरोपियन देशांमधील राष्ट्रीय व्यापार संबंध दृढ करण्यासाठी पुढाकार

  • जर्मनी येथील डॉन लिमन कंपनीचे प्रतिनिधी अँड्रियास शिंडलर व पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्यात चर्चा

  • यामध्ये महाराष्ट्रातील हापूस आंबा व केशर आंबा युरोपियन देशांस व अमेरिका येथे आयातीबाबत चर्चा

  • केळी, मिरची, डाळिंब, स्ट्रॉबेरी भारतातून पाठवता येथील का, याबाबतही चर्चा

  • युरोपियन देशांना महाराष्ट्रातील कृषिमाल निर्यातीकरिता वाव

  • निर्यातीसाठी पणन मंडळ पूर्ण सहकार्य करेल

  • डॉन लिमन कंपनीचे व्यवस्थापक मधू कल्यपुरा मुनीकृष्णप्पा यांनी महाराष्ट्रातून चांगल्या प्रतीचे २५० ग्रॅमवरील आले निर्यातीस तयारी दर्शवली

राज्यातील विविध कृषिमालासाठी नवनवीन बाजारपेठांचा शोध घेणे व नवनवीन कृषिमालाची निर्यातवृद्धी करण्याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ सदैव प्रयत्नशील असते. युरोपसारख्या लांब अंतरावरील बाजारपठेमध्ये नवीन कृषिमाल निर्यात करीत असताना सुरुवातीस त्याचा प्रोटोकॉल अंतिम करावा लागतो. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व संस्था घटकांचा समन्वय घडवून आणणे महत्त्वपूर्ण असते.

- सुनील पवार, कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com