

Pune Gunthawari Rules Regularization Deadline Extended But Citizens Must Pay Existing Fees Without Any Relief
sakal
पुणे : गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्यासाठी पुणे महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, राज्य शासनाने शुल्कात सवलत देण्याचे सर्वाधिकार देऊनही पालिकेने नागरिकांना कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे ‘मुदतवाढ दिली; पण शुल्क तेच’ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच नियमितीकरणासाठी शुल्क भरून गुंठेवारी करून घ्यावी लागणार आहे.