पुणे : कगदाच्या कंपनीला आग, सगळे कागद जळून खाक

pune hadapsar paper making company no casualties
pune hadapsar paper making company no casualties

हडपसर (पुणे) : हांडेवाडी रोड येथील स्वामी विवेकानंद औद्योगिक वसाहतमध्ये एका कागदाच्या कंपनीला अचानक आग लागल्याने कंपनीमधील कागद पूर्ण जळून खाक झाले. शनिवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास लागली. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या तीन गाड्या व सहा टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अग्निशामक दलाचे कात्रज केंद्राचे प्रमुख संजय रामटेके यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्राफ्ट स्टुडिओ या कागदाच्या कंपनीला अचानक आग लागली, या आगीमध्ये तळमजला मधील कागद पुष्टा याला आग लागली, पहिल्या मजल्यावर लोखंडी मशीन ठेवण्यात आले होते, त्यामुळे तिथे आग पसरली नाही, मात्र वर जाण्यासाठी जिन्यावर कागदाचे गठ्ठे ठेवले होते, त्यामुळे आग जिन्या द्वारे दुसऱ्या मजल्या पर्यँत गेली, दुसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड होते, यामध्ये मोठ्या प्रमाणात पुष्टा असल्याने तिथे ही मोठी आग लागली होती, हडपसर ,कोंढवा व कात्रज अग्निशामक दलाच्या तीन आगीचे बंब, सहा पाण्याचे टॅंकर आणि एक टाउझर यांनी आग आग आटोक्यात आणली. कंपनीमध्ये कागद पुष्टा मोठ्या प्रमाणात असल्याने ती संपूर्ण विजवण्याकरिता दुपारचे साडेबारा वाजले होते, आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com