पुणे : बंडखोर आमदारांच्या निषेदार्थ हडपसरमध्ये तिरडी आंदोलन

सेना कार्यकर्त्यांकडून बंडखोर आमदारांचा निषेध
Pune hadapsar shiv sena agitation against rebel mla
Pune hadapsar shiv sena agitation against rebel mlasakal

हडपसर : शिवसेनेतील बंडखोर आमदारांबाबत गेली तीनचार दिवसांपासून शिवसैनिकांकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. बंडखोरांचा निषेध नोंदवला जाऊन संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सेनेच्या हडपसर मतदारसंघाच्यावतीनेही तिरडी आंदोलन करण्यात आले. आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांची गाडीतळ ते माळवाडी अशी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून थेट स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला.

विविध मुद्यावरून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील काही आमदारांनी बंड पुकारले आहे. आधी सुरत व तेथून आसाममधील गुवाहाटीत गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेच्या नेत्यांसह शिवसैनिकांमध्ये रोष वाढत आहे. आंदोलने, निषेध, तोडफोड यातून तो सध्या व्यक्त केला जात आहे. हडपसर गाडीतळ येथे जिल्हाप्रमूख विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. त्यानंतर सात रूग्णवाहिनींच्या माध्यमातून गाडीतळ ता माळवाडी येथील अमरधाम स्मशानभूमीपर्यंत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. रूग्णवाहिनीतून प्रतिकात्मक तिरडी उतरवून तीचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलनही केले.

शहर उपप्रमुख समीर तुपे, मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र बाबर, जानमहंमद शेख, महिला संघटिका संगीता ठोसर, विद्या होडे, माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, प्राची आल्हाट, तानाजी लोणकर, नितीन गावडे, अभिमन्यू भानगिरे, महेंद्र बनकर, धनराज घुले, स्वप्नील वसावे, संतोष होडे, संजय सपकाळ, अनिकेत सपकाळ, तोषिस पटेल, अजय सपकाळ, वैशाली काळे, रेणुका साबळे, कोमल भाडळे, सलमा भाटकर, वैशाली कापसे, सुनीता देशमुख, सुनील मुंजी, सुरज कांबळे, अमित कांबळे, दत्ता खवळे, बाबू काळे, मुकुंद लाकडे, मयूर फडतरे आदींसह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

"ज्या सेनेवर आणि ज्या ठाकरे या नावावर मोठे झाले, त्यांनाच दूषणे देत बंड करणाऱ्या आमदार शिंदे यांनी थेट पक्षप्रमुखांनाच आव्हान दिले आहे. खरे व सच्चे शिवसैनिक हे कधीही सहन करणार नाहीत. सेनेने अशी कित्येक बंडे पचविली असून या प्रत्येक वेळी तीची ताकद वाढत गेली आहे. याही वेळी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे ती निश्चितपणे भरारी घेईल. बंडात सामील सर्वांचा आम्ही निषेध नोंदवत आहोत.'

- विजय देशमुख जिल्हाप्रमुख, शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com