Ukraine : ...म्हणून भारत उचलतोय सावध पावलं, ही आहेत 5 मोठी कारणं

रशिया युक्रेन प्रश्नावर भारताची भूमिका तटस्थ राहिली आहे.
 ukraine india
ukraine indiasakal

Russia Ukraine War : रशिया युक्रेन प्रश्नावर भारताची भूमिका तटस्थ राहिली आहे. भारताने एका आठवड्यात दुसऱ्यांदा संयुक्त राष्ट्रात रशियाविरोधातील ठरावावर मतदान करण्यापासून स्वतःला दूर ठेवले असून, सोमवारी बेलारूस सीमेवर रशिया आणि युक्रेन यांच्यात पार पडलेल्या चर्चेच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले आहे. भारताशिवाय चीन आणि संयुक्त अरब अमिरातीनेही मतदानात भाग घेतलेला नव्हता. (India Taking Cautious Steps In Ukraine Russia Crisis)

 ukraine india
Ukraine : ''गरज पडल्यास भारतीयांसाठी वायुसेनेची मदत घेऊ''

युक्रेन प्रश्न सोडवण्यासाठी मुत्सद्देगिरी आणि संवादाने मार्गशिवाय पर्याय नसल्याच्या भूमिकेवर भारताने वेळोवेळी जोर दिला असून, संवाद हाच मतभेद दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे भारताने म्हटले आहे. युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध करण्यापासून भारताने स्वतःला दूर ठेवले असून, चर्चेतून समस्येवर तोडगा काढण्याचा आग्रह धरला आहे. या सर्वामध्ये भारताकडून युक्रेनबाबत अतिशय सावध भूमिका घेतलीजात असून यामागे अनेक कारणे आहेत.

 ukraine india
झेलेन्स्कींना संपवण्यासाठी रशियाने पाठवले 400 भाडोत्री मारेकरी

यामुळे भारताकडून सावध भूमिका

1) भारतासाठी युक्रेनचे संकट हे दोन ध्रुवांमध्‍ये बांधलेल्या दोरीवर चालण्यासारखे असून, जुना मित्र रशिया आणि पश्चिमेतील नवीन मित्र यांच्या दबावाचा सामना करावा लागत आहे.

2) रशिया हा भारताचा शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा पुरवठादार असून, रशियाने भारताला बॅलेस्टिक मिसाईल पाणबुडी दिली आहे.

3) भारताकडे २७२ सुखोई ३० फायटर जेट असून हे देखील रशियाकडून मिळाले आहेत. याशिवाय भारताकडे किलो क्लासच्या पाणबुड्या आणि 1,300 पेक्षा जास्त T-90 टँक्स आहेत, जे रशियाने भारताला पुरवले आहेत.

4) अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारत रशियाकडून S-400 हवाई संरक्षण प्रणाली विकत घेण्यावर ठाम राहिला आहे. S-400 ही रशियाची सर्वात प्रगत लांब पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. या क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी भारताने 2018 मध्ये रशियासोबत 5 अब्ज डॉलर्सचा करार केला होता.

5) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सर्व मुद्द्यांवर रशिया भारताच्या पाठीशी उभा राहिली आहे.

 ukraine india
देशप्रेमाची झिंग! युक्रेनमध्ये बिअर कंपनीकडून पेट्रोल बॉम्बची निर्मिती

अमेरिकेने वाढवला भारतावर दबाव

तर दुसरीकडे अमेरिकेनेही रशियाविरोधात प्रतिक्रिया देण्यासाठी भारतावर दबाव वाढवला असून, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी ब्लिंकेन यांनी रशियाच्या युक्रेनवरील पूर्वनियोजित आणि अन्यायकारक हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सशक्त सामूहिक प्रतिसाद महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. रशियाने जशी भारताला मदत केली आहे त्याप्रमाणेच भारतासाठी अमेरिका संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञानात एक प्रमुख भागीदार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com