
Pune Heat Wave: पुणे शहरात यंदाच्या सिझनमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. शहरातील महापालिका हद्दीतील लोहगावात ४०.४ डिग्री इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी लोहगावातील तापमानाचा पारा चाळीशीच्या वर राहिल्यानं आजचा दिवस हा खूपच उष्णतेचा राहिला. दिवसभरात तळपत्या सूर्यामुळं उष्णतेची लहर अनुभवायला मिळाली. त्यामुळं लोकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याकडून दिला जात आहे.