Buldana Farmer Suicide : शेतीच्या समस्या आणि त्यातून शेतकऱ्यांची होणारी फरपट आता नवी राहिलेली नाही. जीवन यात्रा संपवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. बुलडाण्यातील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यानं महाराष्ट्र राज्याचा 'युवा शेतकरी' पुरस्कार पटकावला होता.