

Flooded Indrayani river submerging bridges near Alandi-Dehu as heavy rainfall
esakal
पुणे जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस हा पाऊस कायम राहणार असल्याने प्रशासन अलर्टवर आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला आणि आषाढी वारीसाठी येत असलेल्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखीच्या नियोजनाबाबत दिले निर्देश पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.