Pune Rain
Pune RainSakal

ऐन नवरात्रोत्सवात पुणेकरांना पावसाच्या जोरदार सरींनी झोडपून काढले

मागील दोन दिवसांपासून शहरात सकाळी ऊन तर दुपारनंतर ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटासह पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत.
Summary

मागील दोन दिवसांपासून शहरात सकाळी ऊन तर दुपारनंतर ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटासह पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत.

पुणे - ऐन नवरात्रोत्सवात पुणेकरांना पावसाच्या जोरदार सरींनी झोडपून काढले आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी हजेरी लावत आहेत. तर शुक्रवारी (ता. ३०) देखील शहर व परिसरात धुव्वाधार पाऊस पडला. ही स्थिती पुढील दोन ते तीन दिवस अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

मागील दोन दिवसांपासून शहरात सकाळी ऊन तर दुपारनंतर ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटासह पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. शुक्रवारी देखील शहरात असेच चित्र पाहायला मिळाले. त्यात पावसासह वारे वाहत असल्याने काही भागात झाड पडीच्या घटना देखील घडल्या. तर रस्त्यांवर ही पाणी साचल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली. जोरदार पावसाने अक्षरशः रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली. पावसाची स्थिती पाहता, दीड ते दोन तास जोरदार बरसल्यानंतर पावसाचा जोर कमी होत आहे. दिवसा पडणारे ऊन आणि दुपारनंतर पाऊस. त्यामुळे सध्या पुणेकरांना उकाडा आणि पावसाची, अशी दुहेरी अनुभूती होत आहे. पावसामुळे मात्र नागरिकांना उकाड्यापासून काहीशी सुटका मिळत आहे. शहरात शुक्रवारी ३५.१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहर व परिसरात सोमवारपर्यंत (ता. ३) सामान्यतः ढगाळ वातावरण तसेच, मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तर अधूनमधून जोरदार सरी देखील पडू शकतात. त्यानंतर मात्र पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असल्याचे ही हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.

सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)

पुणे शहर - ३५.१

पाषाण - ७.२

लोहगाव - ९.२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com