Water Leakage at Swargate Metro Station
esakal
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शहरातील स्वारगेट मेट्रो स्थानकात पावसाचे पाणी गळत असल्याचे समोर आल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.