

Pune Heavy Rain: Wagholi-Lohgaon Road Closed, Flights Hit and Homes Flooded
esakal
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहर आणि उपनगरांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून, घरांमध्ये पाणी शिरणे, झाडे कोसळणे तसेच विमानसेवेवर परिणाम होणे अशा विविध घटना घडल्या आहेत. वाघोली-लोहगाव मार्गावरील एका खाजगी कंपनीची बस पाण्यात अडकल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.