Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

intoxicated Driver arrested after fatal crash Maharashtra: दारूच्या नशेत बेफाम वेगाने गाडी हाकणाऱ्या चालकाने सागर सायकर यांना बोनेटवर फरफटत नेत चिरडले; उरुळी देवाचीतील मध्यरात्रीच्या अपघाताने परिसर हादरला
Drunk Driving Tragedy: Youth Crushed After Bonnet Dragging in Pune

Drunk Driving Tragedy: Youth Crushed After Bonnet Dragging in Pune

esakal

Updated on

पुणे : दारूच्या नशेत भरधाव मोटार चालवून जोराची धडक दिल्यानंतर तरुणाला मोटारीच्या बोनेटवरून फरफटत नेले. तो खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावरून मोटार घातल्याने त्याचा मृत्यू झाला. उरुळी देवाची परिसरातील मामा भांजे हॉटेलसमोर रविवारी (ता. १२) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी मद्यपी चालकाला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com