Pune : हॉटेल व्यावसायिकाकडून गोळीबार

राहत्या घरातच पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडी परिसरात घडली.
gun
gunSakal

विश्रांतवाडी : हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरातच पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी विश्रांतवाडी परिसरात घडली. सुरेश शंकरराव धापटे (वय 42, रा.विश्रांतवाडी,कळस ) असे गोळीबार करणाऱ्याचे नाव असून याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

गुरुवारी सायंकाळी घरगुती वादातून धापटे यांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस स्वतःच्या खाजगी पिस्तुलातून गोळी झाडली. याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिस नियंत्रण कक्षाला तात्काळ कळवली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह तात्काळ धाव घेतली.

धापटे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील पिस्तूल व बंदुकीतील इतर गोळ्या जप्त करण्यात आले आहेत. यापूर्वीही 2016 मध्ये देखील सुरेश धापटे याने स्वतःच्या खाजगी पिस्तुलातून गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. सुरेश धापटे हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांनी कौटुंबिक वादातून गोळीबार करण्याची ही दुसरी घटना आहे.

त्यांचे परवानाधारक पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात येणार आहे.याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम करीत आहेत. त्यांनी सांगितले की आरोपीला अटक करण्यात आली असून एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com