Gas Cylinder : हॉटेल व्यावसायिकांना सिलिंडर दरवाढीची झळ

गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका केवळ घरगुती वापरकर्त्यांपर्यंत मर्यादित राहिला नसून, व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर घेणाऱ्यांनादेखील झळ सोसावी लागत आहे.
Professional Gas Cylinder
Professional Gas CylinderSakal
Summary

गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका केवळ घरगुती वापरकर्त्यांपर्यंत मर्यादित राहिला नसून, व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर घेणाऱ्यांनादेखील झळ सोसावी लागत आहे.

पुणे - गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका केवळ घरगुती वापरकर्त्यांपर्यंत मर्यादित राहिला नसून, व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर घेणाऱ्यांनादेखील झळ सोसावी लागत आहे. व्यावसायिकांच्या बाबतीत मात्र थोडी खुशी, बहुत गम अशी परिस्थिती आहे. कारण मार्च २०२२ पासून एप्रिल २०२३ पर्यंत व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महागला आहे.

गेल्या वर्षी मेमध्ये १९ किलोच्या सिलिंडरचे दर २३६४ रुपये झाले होते. त्यानंतर दर कमी होत तो फेब्रुवारी २०२३ मध्ये १७७८ रुपये झाला. मात्र मार्चमध्ये दरवाढ झाल्याने सिलिंडर आता २१२८ रुपयांना झाला आहे. सुरुवातीला स्थिर दर, त्यानंतर झालेली दरवाढ. किंमत कमी झाल्यानंतर मिळालेला दिलासा आणि पुन्हा मार्चमध्ये झालेली दरवाढ यामुळे व्यावसायिक सिलिंडर वापरकर्त्यांना गेल्या वर्षात सुखद आणि दुःखद धक्के मिळाले आहेत.

मात्र वर्षभरात सिलिंडर ११४ रुपयांनी महागल्याचे व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. तसेच इतर वस्तूंचे भाव देखील तेजीत असल्याने या व्यवसायिकांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. व्यावसायिक सिलिंडर महागल्याचा सर्वाधिक फटका हॉटेल क्षेत्राला बसत आहे. तसेच ज्या ठिकाणी विविध कामांसाठी गॅस वापरला जातो ती क्षेत्रे देखील प्रभावित झाली आहेत. त्यामुळे दर कमी करण्याबाबत सरकारने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

डिसेंबर २०२० मध्ये व्यावसायिक वापराचा सिलिंडर १३०० रुपयांना होता. आता तो दोन हजार १२८ रुपयांना झाला आहे. तेलाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या व्यवसायातील खर्च वाढला आहे. मात्र जर त्या तुलनेत खाद्यपदार्थांचे दर वाढवले तर त्याचा व्यवसायावर परिमाण होऊ शकतो. त्यामुळे नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. या सर्वांचा विचार करून आता दरवाढ करण्याऐवजी किंमत कमी होणे गरजेचे आहे.

- सागर घोळवे, हॉटेल व्यावसायिक

आम्हाला तेल आणि गॅस मोठ्या प्रमाणात लागत असतो. त्यामुळे त्यांची किंमत वाढली तर त्याचा व्यवसायावर विपरीत परिमाण होतो. वडापावची किंमत वाढवली तर ग्राहक दुसरा पर्याय शोधतात. त्यामुळे कायमस्वरूपी धंदा कमी होतो. गेल्या तीन वर्षांत महागाईमुळे धंदा करणे मुश्‍कील झाले आहे.

- राकेश साबळे, वडापाव स्टॉलधारक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com