धक्कादायक! पुण्यात चक्क बिर्याणीतील चिकनमधून रक्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

येथील प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये चिकनमधून रक्त येत असल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. ग्राहकाने तक्रार केल्यानंतर त्याला 15 डिस्काउंट देऊन हा विषय येथेच थांबविला, हा प्रकार रविवारी रात्री घडला. 

पुणे : येथील प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये चिकनमधून रक्त येत असल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. ग्राहकाने तक्रार केल्यानंतर त्याला 15 डिस्काउंट देऊन हा विषय येथेच थांबविला, हा प्रकार रविवारी रात्री घडला. 

वसतिगृहात राहणारी काही मुले रविवारी रात्री कर्वेनगर येथील बिर्याणीच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. ते जेवत असताना चिकन मधुन रक्त येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी संबंधितांना दाखविले. मुलांना अन्नाचा व्हिडीओ काढला. हॉटेल कोणते याचा व्हिडीओ काढून दिला नाही. 

ग्राहकाने तक्रार केल्यानंतर त्याला व्हिडीओ काढून दिला नाही. आमच्याकडे चिकनचे पीस मोठे असतात यामुळे कधी तरी असे चुकून रक्त राहते असे हॉटेल चालकाने ग्राहकाला सांगितले. तसेच त्याला 15 टक्के डिस्काउंट देऊन हा विषय येथे थांबविला. हॉस्टेलची मुले असल्याने त्यांनी तक्रार देणे टाळले. रक्त येत असल्याने चिकन खाउशी वाटले नाही असे त्या मुलांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Hotel served Biryani with Blood