वाहनांच्या स्वप्नाची पूर्ती करणाऱ्या ऑटो एक्स्पोचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Auto Expo 2023

मकरसंक्रांत आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या सुरवातीला आपल्या गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ‘ऑटो एक्स्पो २०२३’ भरविण्यात आला आहे.

Sakal Auto Expo 2023 : वाहनांच्या स्वप्नाची पूर्ती करणाऱ्या ऑटो एक्स्पोचे उद्घाटन

पुणे - मकरसंक्रांत आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या सुरवातीला आपल्या गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ‘ऑटो एक्स्पो २०२३’ भरविण्यात आला आहे. शनिवारी (ता. १४) सकाळी दिमाखदार सोहळ्यात या एक्स्पोचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्या (रविवारी) एक्स्पोचा शेवटचा दिवस आहे.

आमदार उमा खापरे, पुणे वन विभागाचे उप वन संरक्षक (प्रादेशिक) राहुल पाटील, ‘तुनवाल र्इ मोटर्स’चे व्यवस्थापकीय संचालक जुमरलाल तुनवाल, ‘एस. कुदळे इलेक्ट्रिक बाईक’चे संचालक नीरज कुदळे, ‘सेहगल ऑटो राइडर्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत वझे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अंकित काणे, जाहिरात विभागाचे सरव्यवस्थापक रूपेश मुतालिक आणि सहायक सरव्यवस्थापक रवी काटे यावेळी उपस्थित होते. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी एक्स्पोला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

उद्घाटनाप्रसंगी खापरे म्हणाल्या, ‘‘पुणे हे ऑटो क्षेत्राचे हब आहे. जगातील नामांकित कंपन्यांच्या वाहनांचे उत्पादन येथे होते. वाहनांसाठी आवश्‍यक असलेले छोटे पार्ट तयार करणाऱ्या अनेक कंपन्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. त्यातून मोठा रोजगार निर्माण होत आहे. वर्षाच्या सुरवातीलाच ‘सकाळ’ने या एक्स्पोचे आयोजन केले आहे. त्याबद्दल ‘सकाळ’चे अभिनंदन. एकाच ठिकाणी अनेक पर्याय असेल तर ग्राहकांना सोर्इस्करपणे माहिती मिळते व त्यांना गाडी घेणे आणखी सोपे होते.

पाटील म्हणाले, ‘मी मॅकेनिकल इंजिनिअर असल्याने मला वाहनांची आवड आहे. त्यामुळे मी आवर्जून या एक्स्पोसाठी आलो. पत्रकारितेबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ‘सकाळ’ अनेक वर्षांपासून करीत आहे. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन ‘सकाळ’ ने हा उपक्रम हाती घेतला आहे. एक्स्पोचा अनेकांना लाभ होर्इल. त्यामुळे या उपक्रमाबद्दल अभिनंदन.

तुनवाल म्हणाले, ‘गाडी घेण्याची इच्छा असलेल्यांना विविध पर्यायांचा शोध घेत फिरायला लागू नये म्हणून ‘सकाळ’ने हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांना (र्इव्ही) मागणी आहे. कारण या वाहनांमुळे प्रदूषण आणि वाहन वापरण्याचा खर्च कमी होत आहे. देशातील पर्यावरणाच्या दृष्‍टीने असे एक्स्पो गरजेचे आहेत.

कुदळे म्हणाले, ‘एक्स्पोच्या निमित्ताने वाहनांचे अनेक पर्याय ग्राहकांना एकाच ठिकाणी पाहायला व खरेदी करायला मिळत आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन यापुढे देखील असे कार्यक्रम होणे आवश्‍यक आहे.’

सेहगल म्हणाले, ‘कोणते वाहन घ्यावे याबाबत अनेकांच्या मनात शंका असते. मात्र त्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळाली तर त्यांना निर्णय घेणे सोपे होते. या एक्स्पोच्या माध्यमातून तेच साध्य झाले आहे. त्यामुळे हा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे’. काणे यांनी आभार मानले.

वाहनांचे बजेटनुसार अनेक पर्याय -

पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रॉनिक कार आणि दुचाकीचे अनेक पर्याय नागरिकांना या एक्स्पोत उपलब्ध आहेत. एकाच बजेटचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने नेमकी कोणती गाडी घ्यायचा याचा निर्णय घेणे एक्‍स्पो माध्यमातून सोपे होणार आहे. या ठिकाणी विविध कंपन्यांच्या कार आणि दुचाकी, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्या किमती आदींची माहिती मिळणार आहे. एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकलचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठ्याचे अनेक पर्यायही एक्स्पोत उपलब्ध आहेत.

एक्स्पोत सहभागी झालेल्या कंपन्या -

सिट्रोएन, स्कोडा, फोक्सवॅगन, एमजी, किया, महिंद्रा, टाटा, मारुती सुझुकी, नेक्सा, हुंदई, निस्सान, होंडा कार्स, हिरो, सुझुकी, जीप, तुनवाल, बीगॉस, इजीराइड, एथर

सकाळ ऑटो एक्स्पो २०२३ बाबत :

कुठे : पंडित फार्म्स, डीपी रोड, कर्वेनगर

कधी : १५ जानेवारीपर्यंत

वेळ : सकाळी ११ ते रात्री ८

प्रवेश व पार्किंग मोफत