
महाराष्ट्रातील पुण्यातील एका भंगार व्यावसायिकाच्या हत्येची खळबळजनक घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. घोसी पोलीस स्टेशन हद्दीतील माननपूर गावाजवळ शनिवारी, १२ एप्रिल रोजी सकाळी मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर सोमवार १४ एप्रिल रोजी मृतदेहाची ओळख पटली. मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण साधू शिंदे असे आहे. हा पुण्यातील एक व्यापारी होता आणि तो भंगार व्यवसायिक होता.