esakal | मद्यविक्री व्यावसायिकांकडून मद्य विक्रीसाठी नवनवीन युक्त्या
sakal

बोलून बातमी शोधा

मद्यविक्री व्यावसायिकांकडून मद्य विक्रीसाठी नवनवीन युक्त्या

मद्यविक्री व्यावसायिकांकडून मद्य विक्रीसाठी नवनवीन युक्त्या

sakal_logo
By
शीतल बर्गे

बालेवाडी : देशात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात देखील कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केले असून, फक्त अत्यावश्यक वस्तू, तसेच औषधांची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व दुकाने बंद आहेत. मद्य विक्री व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून मद्यविक्री घरपोच सेवा देऊनच करता येणार आहे, असे असले तरी बाणेर बालेवाडी येथे वेगवेगळ्या युक्त्या करून मद्याची विक्री केली जात आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' ची नियमावली जाहीर केली असून जिल्ह्यांत लॉक डाऊन करण्यात आले आहे. सकाळी 7 ते 11 या वेळेत जीवनावश्यक वस्तची दुकाने सुरु आहेत. इतर सर्व दुकाने बंद आहेत. मद्य विक्रीची दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. फक्त घरपोच सेवा देऊनच मद्य विक्री केली जाऊ शकते. असे असले तरी 'ब्रेक द चेंज' ची नियमावली धाब्यावर बसून बाणेर बालेवाडी ठिकाणी राजरोसपणे मद्य दुकानाजवळ मद्य विक्री केल्याचे समोर आले आहे. बाणेर रस्ता येथे एका मद्य विक्री व्यावसायिकाने दुकानासमोर काळ्या रंगाचा मोठा बॅनर लावला आहे. त्या बॅनरवर दुकानाचा फोन नंबर, व्हाट्सअप नंबर लिहिले आहेत. या ठिकाणी काय सुरू आहे हे रस्त्यावरून लगेच लक्षात येत नाही. पण या ठिकाणी हातात कापडी पिशव्या घेतलेले ग्राहक मात्र रांगा लावून उभे असल्याचे चित्र पाहायला मिळते.

हेही वाचा: जावयाने सासूसोबतच मांडला संसार; बिनसल्यावर उचललं टोकाचं पाऊल

दुकानाच्या बाहेरच लोकांकडून पैसे घेऊन मद्य विक्री केली जात आहे. तर बालेवाडी येथील एका मद्य दुकानाजवळ सकाळी सात वाजायच्या आधीपासूनच मद्य शौकीन दुकानदार येण्याची वाट पाहत उभे असतात. जसे दुकानदार येतो तसे दुकानाजवळ गर्दी वाढते. या दुकानाचे शटर अगदी कमी उघडून त्या ठिकाणी दोन व्यक्ती बसतात, पैसे मोजून घेतात, मद्य मात्र दुकानातून न घेता दुकानाच्या बाजूच्या गल्लीमध्ये नेऊन ग्राहकांना दिले जाते. या परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर या ठिकाणी जाऊन कारवाही करण्यात आल्यामुळे सध्या तरी हे दुकान बंद आहे. अशा पद्धतीने लॉकडाऊन मध्ये मद्यशौकीन आपल्या मद्याचा शौक पूर्ण करत आहेत, तर मद्य व्यावसायिक मद्य विक्रीसाठी अशा वेगवेगळ्या युक्त्या आजमावताना दिसत आहेत.

loading image