Pune : शेतकऱ्यांचे वीज पंप तातडीने न जोडल्यास तीव्र आंदोलन छेडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : शेतकऱ्यांचे वीज पंप तातडीने न जोडल्यास तीव्र आंदोलन छेडणार

Pune : शेतकऱ्यांचे वीज पंप तातडीने न जोडल्यास तीव्र आंदोलन छेडणार

लोणी देवकर ( ता. इंदापूर ) : पंचक्रोशीत महावितरणने शेतकऱ्यांचे वीजपंपाचे तोडलेले कनेक्शन तातडीने जोडावे या मागणीसाठी माजी सहकार मंत्री, भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाकिसान मोर्च्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दि. २५ नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांचे वीज जोड न जोडल्यास दि.२६ नोव्हेंबर रोजी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक चौकात रास्ता रोको आंदोलनकरण्याचा इशारा किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख माऊली चवरे यांनी दिली. यावेळी माऊली चवरे, आकाश कांबळे व सहकाऱ्यांनी लोणी देवकर वीजवितरण कार्यालयास निवेदन दिले

यावेळी किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख माऊली चवरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची चालविलेली थट्टा त्वरीत थांबवावी. कोरोना महामारीमधून शेतकरी कसा तरी वाचला असताना आता विज पुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांवर अर्थसंकट आले. पशुधनास व घरी पिण्याचे पाणी आणणे देखील वीज बंद असल्याने अवघड झाले आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी निदर्शने करण्यात आली, शासनाचा निषेध करण्यात आला मात्र वीज जोड न जोडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.

हेही वाचा: 'अब्बाजान, चच्चाजानच्या लोकांनी लक्षात ठेवावं...', योगींचा ओवैसींना इशारा

भाजयुमोचे प्रदेश सचिव आकाश कांबळे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला गांभीर्य दिसत नसून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाची देखील शासनाने थट्टा चालवली असून हे महाभकासआघाडीचे सरकार आहे. शेतकरी व कामगार त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवून देतील.

यावेळी कर्मयोगी कारखान्याचे संचालक प्रवीण देवकर, प्रशांत गलांडे-पाटील, आबा साहेब थोरात,सागर देवकर, गणपत करे, गणेश भांडवलकर, परशुराम गुणवरे, राहुल शिंदे, मधुकर चव्हाण, ज्ञानेश्वर देवकर, लक्ष्मण चितळकर, किशोर मदने, अमोल देवकर व किसान मोर्च्याचे कार्यकर्ते,शेतकरी उपस्थित होते.

loading image
go to top