‘पिफ’च्या समारोपात ‘चुंबक’चा गौरव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या वेळी ‘पिफ’च्या या वर्षीच्या संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारावर ‘चुंबक’ने मोहोर उमटविली.  इवा ह्युसन दिग्दर्शित ‘गर्ल्स ऑफ द सन’ चित्रपटाने ‘प्रभात’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला. 

महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी समारोपाच्या कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा केली. ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना ‘दिठी’ या चित्रपटासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शक’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट छायालेखनाचा पुरस्कार ‘दिठी’साठी धनंजय कुलकर्णी यांना मिळाला. ‘चुंबक’मधील अभिनयासाठी स्वानंद किरकिरे यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला, ‘नाळ’ चित्रपटासाठी देविका दफ्तरदार यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘सर्वोत्कृष्ट पटकथा’ हा पुरस्कार चुंबक चित्रपटाचे पटकथाकार सौरभ भावे व संदीप मोदी यांना मिळाला.

  ‘प्रभात’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक : रोड्रीगो बारीओसो, सेबेस्टीयन बारीओसो (चित्रपट ‘अ ट्रान्सलेटर’)
  एमआयटी-एसएफटी ह्युमन स्पिरिट ॲवॉर्ड : दिग्दर्शिका पिपो मेझापेसा ( चित्रपट : माय ओन गॉड)

Web Title: Pune International Film Festival concluded