Vande Sadharan Express : वंदे साधारण एक्स्प्रेसच्या ट्रॅकवर पुणे नाही

सामान्य प्रवाशांना डोळ्यांसमोर ठेवून वंदे साधारण एक्स्प्रेस रेल्वेची निर्मिती करण्यात आली.
Vande Sadharan Express Engine
Vande Sadharan Express Enginesakal

- प्रसाद कानडे

पुणे - रेल्वे बोर्डाने वंदे साधारण एक्स्प्रेससाठी पहिल्या टप्प्यात पाच मार्गांची निवड केली असून १८ मार्ग प्रस्तावित आहेत, मात्र यातील कोणत्याही योजनेत पुण्याचा समावेश नाही. पुण्याहून दरभंगा, हावडा, गोरखपूर आदी शहरांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात पुण्याहून वंदे साधारण एक्स्प्रेस सुरू होण्यासाठी रेल्वे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर सामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे त्यास प्रतिसादही कमी मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रवाशांना डोळ्यांसमोर ठेवून या रेल्वेची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे तुलनेने कमी दराच्या तिकिटात ताशी १३० किलोमीटर वेगाने प्रवासाचा अनुभव सामान्य प्रवाशांना मिळू शकेल.

चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीत (आयसीएफ) ही गाडी तयार करण्यात आली. तेथून पहिला रेक मुंबईत दाखल झाला. लवकरच त्याची चाचणी होईल. २२ डब्यांच्या या रेल्वेच्या निर्मितीसाठी सुमारे ६५ कोटी रुपये इतका खर्च आला.

वंदे भारतची अजूनही प्रतीक्षा

मुंबई - सोलापूर - मुंबई ही वंदे भारत एक्स्प्रेस पुण्याहून धावत असली तरी ती गाडी पुणे विभागाची नाही. पुण्याहून सिकंदराबाद, नागपूर,अहमदाबाद या शहरांना वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या देखभालीसाठी पुण्यात सुमारे ९० कोटी रुपये प्रस्तावित खर्चाच्या कोचिंग डेपोला मंजुरी मिळाली आहे. असे असले तरी पुण्याला वंदे भारत एक्स्प्रेसची अजूनही प्रतीक्षा आहे.

हे मार्ग मंजूर

१) नवी दिल्ली- पाटणा

२) नवी दिल्ली- हावडा

३) नवी दिल्ली- हैदराबाद

४) नवी दिल्ली- मुंबई

५) एर्नाकुलम- गुवाहाटी

हे मार्ग प्रस्तावित

१) मुंबई - छापरा

२) मंगळूर - कोलकता

३) मुंबई - रकसुल

४) नागरकोईल - हैदराबाद

५) मुंबई - जम्मू तावी

६) नागरकोईल - ओखा

७) अहमदाबाद - दरभंगा

८) तानकपुर - सिंगरौली

९) पोरबंदर - कोलकता

१०) जम्मू तावी - गुवाहाटी

११) उधना - जयनगर

१२) गोरखपूर - मुंबई

१३) लुधियाना - दरभंगा

१४) मुझफ्फरपूर - अहमदाबाद

१५) हावडा - अहमदाबाद

१६) वाराणसी - दरभंगा

१७) सहारासा - अमृतसर

१८) मंगळूर - मुंबई

वंदे साधारण एक्स्प्रेसच्या निर्मितीला आत्ताच सुरवात झाली आहे. या गाड्या कोणत्या मार्गावर सुरू करायची या बाबतचे निर्णय रेल्वे बोर्ड घेते. पहिल्या टप्प्यात पुण्याला ही रेल्वे मिळाली नसली तरी येत्या काळात ती नक्की मिळेल.

- रावसाहेब दानवे, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com