esakal | पुणे : IAS तर्फे CRPF जवानांना सायकल प्रशिक्षण उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुणे : IAS तर्फे CRPF जवानांना सायकल प्रशिक्षण उपक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ‘इन्डो ॲथेलिटिक्स सोसायटी’तर्फे (IAS) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CRPF) जवानांच्या सायकल मोहिमेसाठी पाच दिवसांचा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे ते दिल्ली या सायकल मोहिमेचे आयोजन सीआयएसएफ मार्फत करण्यात आले आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे देशभरातून बारा जवानांची निवड करण्यात आली आहे.

यामोहिमेत पी आर यादव, राहुल पवार, धीरज जांगिड, श्रीराम बाबर, मुकेश कुमार आदींचा समावेश असून संस्थेचे सदस्य गजानन खैरे, गणेश भुजबळ आणि अजित पाटील यांनी जवानांना प्रशिक्षण दिले. ही सायकल मोहीम येत्या शनिवारी (ता. ४) येरवडा कारागृह येथून सुरू होणार आहे. मोहिमेअंतर्गत सीआयएसएफ जवानांचा संघ एक हजार ७७५ किलोमीटरचा प्रवास करणार असून त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी, विविध भागातील रस्त्यांच्या सरावासाठी आणि लांब पल्ल्याच्या प्रवास सायकलद्वारे करण्याकरिता मोफत प्रशिक्षण देण्यात आल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा: ‘आयटीआय’ची अंतिम गुणवत्ता यादी ४ सप्टेंबरला होणार जाहीर

शारीरिक क्षमता जरी जास्त असली तरी तांत्रिकदृष्ट्या सायकलिंग करण्याची माहिती बऱ्याच सदस्यांना नव्हती. तर काही सदस्यांनी गिअरच्या सायकली चालवल्या नाहीत पण या मोहिमेसाठी निवड झाल्यामुळे त्यांना प्रशिक्षणाची खूप गरज होती. अशात विविध भागांमध्ये झालेल्या सरावामुळे मिळालेल्या अनुभवाचा मोहिमेत नक्कीच उपयोग होईल. असे सीआयएसएफचे पोलिस निरिक्षक निरिक्षक उतरा पणवर यांनी सांगितले.

loading image
go to top