Pune : पुण्यात अनर्थ टळला, आयटी बिझनेस हबमधे आग; सुरक्षा रक्षक, फायर ब्रिगेडच्या जवानांमुळे दोन हजार कर्मचारी सुखरुप बाहेर

विमाननगर येथील सॉलिटर बिझनेस हब आयटी कंपनीत मंगळवारी दुपारी आग लागली. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली.
Pune IT Business Hub Fire
Pune IT Business Hub FireSakal
Summary

विमाननगर येथील सॉलिटर बिझनेस हब आयटी कंपनीत मंगळवारी दुपारी आग लागली. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली.

पुणे - विमाननगर येथील सॉलिटर बिझनेस हब आयटी कंपनीत मंगळवारी दुपारी आग लागली. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. आयटी बिझनेस हबमधील दोन हजार कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्यामुळे अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉलिटर बिझनेस हब आयटी कंपनीच्या तळमजल्यातील इलेक्ट्रिक रुममधे दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. शेवटच्या नवव्या मजल्यापर्यंत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांमध्ये घबराट उडाली.

आयटी कर्मचाऱ्यांनी ही बाब अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात कळविली. त्यानंतर पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंब, ‘पीएमआरडीए’चे दोन बंब, एक पाणी टँकर आणि उंच शिडीचे (ब्रॉन्टो) वाहन घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून दीड तासांत आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाचे सहायक विभागीय अधिकारी रमेश गांगड, येरवडा केंद्रप्रमुख सुभाष जाधव, तांडेल अंकुश पालवे, दत्तात्रेय सातव, फायरमन सचिन झुजाळे, किरण चौधरी, चंद्रकांत आनंददास यांच्यासह इतर जवानांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

इलेक्ट्रिक रुममध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे डक्टमध्ये आग पसरली आणि सर्व मजल्यांवर धुराचे लोट पसरले होते. आयटी कंपनीचे सुरक्षा रक्षक आणि अग्शिशमन दलाच्या जवानांनी आयटी कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. तसेच, खबरदारी म्हणून १०८ च्या दोन रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com