

Godman and Two Others Arrested in Rs 14 Crore Fraud Case Targeting Pune IT Engineer
Esakal
पुण्यात आयटी इंजिनिअरला परदेशातली मालमत्ता, पुण्यातलं घर, जमीन विकायला लावून त्याची १४ कोटींची फसणूक केल्या प्रकरणी भोंदूबाबासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी नाशिकमधून तिघांना अटक केलीय. वेदिका पंढरपूर नावाच्या महिलेनं अंगात शंकर महाराज येतात असं सांगत इंजिनिअरला सर्व संपत्ती विकायला लावली. त्याच्या मुलींवर उपचारासाठी हे करावं लागेल असं सांगितलं. सगळं विकूनही मुलींच्या तब्येतीत फरक न पडल्यानं आपली फसवणूक झाल्याचं इंजिनिअरच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली होती.