Pune IT Engineer Death: खळबळजनक! पुण्यात तरूण IT अभियंत्याने कंपनीतच उचललं टोकाचं पाऊल; भर मिटींगमधून उठला अन्...

Atlas Copco Hinjewadi IT Engineer Death : प्राप्त माहितीनुसार हिंजवडीतील ॲटलास कॉपको कंपनीमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांना घटनास्थळी एक पत्र देखील मिळाली आहे.
Death
DeathSakal
Updated on

Hinjewadi IT Park Death news : पुण्यातील हिंजवडी परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.  या ठिकाणी असलेल्या एका कंपनीतील तरूण आयटी अभियंत्याने कंपनीतच आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे छातीत दुखत असल्याचे सांगून तो मिटींगमधून सोडून बाहेर पडला होता आणि त्यानंत त्याने थेट सातव्य मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं!

हिंजवडीतील ॲटलास कॉपको कंपनीमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील मिळाली आहे, परंतु त्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलंय याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तर काही दिवसांपूर्वीच हा तरूण अभियंता कंपनीत रूजू झाला होता, अशीही माहिती समोर आली आहे.

तर या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाय, हिंजवडीतील आयटी वर्तुळात उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत  आणि हळहळही व्यक्त होत आहे. शिवय, आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.  घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Death
Snake Monkey Viral Video: फना काढून बसलेल्या नागाला पाहून माकडानं असं काही केलं की तुम्हीही पाहून थक्क व्हाल!

प्राप्त माहितीनुसार, पियूष अशोक कवडे असे या २३ वर्षीय तरूण आयटी अभियंत्याचं नाव आहे. पुण्यातील वाकड परिसरात तो राहत होता. तर त्याचं मूळ गाव नाशिक आहे. सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनास पाठवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com