Itians : जॉयनिंगच्या आशेवर बसलेल्या अनेक आयटीयन्सच्या पदरी अखेर निराशाच

चांगल्या कंपनीत बड्या पगाराची नोकरी लागेल म्हणून वर्षभरापेक्षा जास्त काळ जॉयनिंगच्या आशेवर बसलेल्या अनेक आयटीयन्सच्या पदरी अखेर निराशाच पडली आहे.
Itians
ItiansSakal
Summary

चांगल्या कंपनीत बड्या पगाराची नोकरी लागेल म्हणून वर्षभरापेक्षा जास्त काळ जॉयनिंगच्या आशेवर बसलेल्या अनेक आयटीयन्सच्या पदरी अखेर निराशाच पडली आहे.

पुणे - चांगल्या कंपनीत बड्या पगाराची नोकरी लागेल म्हणून वर्षभरापेक्षा जास्त काळ जॉयनिंगच्या आशेवर बसलेल्या अनेक आयटीयन्सच्या पदरी अखेर निराशाच पडली आहे. ऑफर लेटर मिळाल्यानंतर १२ महिन्यांहून अधिक काळ रुजू होण्याची वाट पाहिलेल्या अनेक उमेदवारांना एका बड्या कंपनीने थेट कामावर घेण्यास नाकारले आहे.

अचानकपणे नोकरी नाकारण्यात आल्याने उमेदवारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे आता त्यांचा पुन्हा नोकरीसाठी शोध सुरू झाला आहे. या कंपनीने जानेवारी २०२२ मध्ये या फ्रेशर्सना प्रशिक्षण आणि नोकरीसाठी ऑफर लेटर पाठवले होते. त्यांना ऑनबोर्डिंगची तारीख देण्याऐवजी कंपनीने आता सहा ते सात आठवड्यांच्या कालावधीसह एक लर्निंग आणि ट्रेनिंग प्रोग्रॉम सुरू केला आहे. एक तर हे मूल्यांकन आधारित प्रशिक्षण घ्या नाहीतर त्यांना देण्यात आलेली ऑफर आपोआप रद्द होईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एकतर या आयटीयन्सला प्रशिक्षण घेऊन पुन्हा जॉइन करून घेण्याची वाट पहावी लागणार आहे किंवा त्वरित दुसरी नोकरी शोधावा लागणार आहे.

आयटी कामगारांची संघटना असलेल्या नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लाईज सिनेटने याबाबत सांगितले की, भविष्यातील भरती पद्धतीसाठी हे धोकादायक उदाहरण ठरणार आहे. कंपनी फ्रेशर्सना अनिश्चिततेच्या स्थितीत ठेवत आहेत. त्यांना ऑनबोर्डिंग करून घेण्याची मुदत लांबविण्यासाठी या नवीन पद्धतीचा वापर केला जात आहे. नोकरी मिळण्याची आतुरतेने वाट पाहात असलेल्या फ्रेशर्सवर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. यामुळे उमेदवारांनी कंपनीवर ठेवलेल्या विश्वासाचे देखील उल्लंघन झाले आहे. त्यामुळे फ्रेशर्सच्या ऑनबोर्डिंगसाठी एक स्पष्ट आणि पारदर्शक धोरण असणे गरजेचे आहे.

प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी असेल का?

अनेक बड्या कंपन्यांमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे. ऑफर लेटर दिल्यानंतर उमेदवारांना रुजू करून घेण्याची वेळ येते तेव्हा त्यांना विविध मार्गांनी टाळले जात आहे. मूल्यांकन आधारित प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना नोकरीची हमी कोणीही देत नाही. त्यामुळे प्रशिक्षण घेतल्यानंतर देखील त्यांना नाकारले जाऊ शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

अपेक्षित पगाराची नोकरी मिळणार या भरवशावर तीन आठ महिने मी जॉयनिंगची वाट पाहिली. आता कंपनी मला प्रशिक्षण घ्यावे लागले, असे सांगत होते. आधीच प्रशिक्षण सुरू केले असते तर आत्तापर्यंत ते पूर्ण होऊन मला नोकरी मिळाली असते. मात्र एवढा कालावधी गेल्यानंतर प्रशिक्षण सुरू करण्यात आले. दरम्यानच्या काळात मी दुसरीकडे नोकरी शोधली नाही. मात्र आता पर्यायांचा विचार करावा लागेल.

- जॉईनिंगची वाट पाहत असलेला फ्रेशर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com