
Acharya Shri Guptinandiji Maharaj addressing Jain followers during Pune protest to save the historic Jain Boarding.
Sakal
Summary
पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणात धर्मादाय आयुक्तांनी व्यवहाराला स्थगिती दिली आहे.
या प्रकरणाची तातडीची सुनावणी मुंबईतील धर्मादाय आयुक्त कार्यालयात झाली.
जैन बोर्डिंगच्या मंदिरालाच गहाण ठेवून बिल्डरला कर्ज मिळाल्याचे उघड झाले आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागा विक्री प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मादाय आयुक्तांनी जागा विक्रीच्या व्यवहाराला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत धर्मदाय आयुक्तांसमोर या प्रकरणाची तातडीची सुनावणी पार पडली. धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे जैन समाजाला दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे.