Murlidhar Mohol : राजू शेट्टी नुरा कुस्ती खेळताहेत, धंगेकर बिळातील उंदीर; जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोपावर मोहोळ यांचं प्रत्युत्तर

Jain Boarding Hostel Sale : त्यांनी राजू शेट्टी व रविंद्र धंगेकर यांच्यावर प्रतिहल्ला करत “ते चुकीची माहिती घेत आहेत” असा दावा केला.राजू शेट्टी, रोहित पवार आणि धंगेकर यांनी मोहोळ यांनी बिल्डर्ससह जमीन हडपल्याचा आरोप केला आहे.
“Members of the Jain community protest outside the Seth Hirachand Nemchand hostel trust office in Pune’s Model Colony, opposing the alleged sale of the land and calling for minister Murlidhar Mohol to clarify his involvement.”

“Members of the Jain community protest outside the Seth Hirachand Nemchand hostel trust office in Pune’s Model Colony, opposing the alleged sale of the land and calling for minister Murlidhar Mohol to clarify his involvement.”

esakal

Updated on

Summary

पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात गाजतोय.

या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.


मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन गोखले कंपनीशी संबंध नसल्याचा खुलासा केला.

Pune Model Colony Jain Trust Land Deal : पुण्यात जैन बोर्डिग हॉस्टेलच्या जागेची बेकायदेशीर विक्री केल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. यावर मोहोळ यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. ते म्हणाले की, माझ्या गोखले कंपनीशी संबंध नाही. कंपनीतून मी २०२४ मध्येच बाहेर पडलो आहे. राजू शेट्टी यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे, ते नुराकुस्ती खेळताहेत, तर रविंद्र धंगेकर हे बिळातील उंदीर आहेत असा असा निशाणा साधला.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, राजू शेट्टी हे ज्येष्ठ नेते आहेत आरोप करण्याआधी त माझ्याशी संपर्क करायला हवा होता, त्यांनी माझ्यावर बेछूट आरोप केले अन् पुण्यातील बिळात लपलेले काही उंदीर बाहेर आहे असे रविंद्र धंगेकरांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला, मी प्रतिज्ञापत्रात सर्व सांगितले आहे, पुणेकरांच्या मनात शंका राहू नये म्हणून मी बोलत आहे, असे ते म्हणाले. रविंद्र धंगेकरांच्या आरोपावर बोलताना मोहोळ म्हणाले की, ते वैफल्यग्रस्त असून त्यांनी याआधीही आरोप केले पण ते पुरावे सादर करु शकले नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com