

Junnar Leopard Attacks: Legal Notice Issued
Sakal
पुणे : जुन्नर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांत वाढ झाली असून, महिला व लहान मुलांचे मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत याबाबत वन विभाग, जिल्हाधिकारी आणि मानवाधिकार आयोगाला कायदेशीर नोटीस पाठवून तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे.