Leopard News : विहीरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाकडुन जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard News

Leopard News : विहीरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाकडुन जीवदान

ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथे विहीरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाकडुन जीवदान देण्यात आले असून परत मादी बरोबर नैसर्गिक आदिवासीत सोडण्यात असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

ओतूर येथील गाढवे मळा परीसरात महादेव तानाजी गाढवे या शेतकऱ्याच्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे व वनक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधाकर गीते, परशुराम खोकले यांच्यासह वनकर्मचार्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

तसेच जुन्नर बिबट रेस्क्यू टीमचे सदस्य विजय वायाळ, मंदार अहिनवे, रवी हांडे, गंगाराम जाधव, किसन केदार हे ही घटनास्थळी दाखल झाले. सदर विहिरीला कठडा नसून विहीरीत खुप कचरा व गवत तसेच छोटी मोठी झाडे झुडपे वाढलेली असल्याने बिबट्याचे बछडे विहिरीतून बाहेर काढण्यासाठी दोरीच्या सहाय्याने विहीरीत सोडलेल्या कॅरेट मध्ये काही बछडा येईना. त्यामुळे शेवटी बिबट रेस्क्यू टीमचे सदस्य विजय वायाळ व गंगाराम जाधव हे दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरले आणि बिबट्याचे बछडे हाताने पकडून कॅरेट मध्ये ठेवून विहीरीच्या बाहेर वरती कठड्यावर काढले. कॅरेट कठड्यावर येताच बिबट्याचे बछडे पळू लागले. त्या बिबट्याच्या बछड्याला परत पकडून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी माणिकडोह बिबीट निवारा केंद्रात पाठवण्यात आले.

@@ ओतूर वनविभागामुळे चार महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याची व त्याची आई यांची भेट.@@

त्यानंतर त्या बिबट्याच्या बछड्याला रात्री परत त्या विहिरीच्या जवळील उसाच्या शेतात ठेवण्यात आले. सदर बिबट्याचा बछडा अंदाजे चार महिने वयाचा होते. त्यास रात्री प्लास्टिक डब्यात वरून हलके लाकडी झाकण ठेवून ठेवले होते. त्यास रात्री बिबट्याची मादी उसाच्या शेतातून आपल्या बरोबर नैसर्गिक आदिवासीत घेवून गेली असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.