

Increasing Leopard Attacks on Livestock in Ghangale Mala
Sakal
राजुरी : राजुरी या ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितुनुसार राजुरी (ता.जुन्नर)येथील घंगाळे मळ्यात बिबटयाचा पाळीव प्राण्यांवर वाढलेले हल्ल्यांमुळे स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी केली होती त्यानुसार वन विभागाने पिंपळगाव जोगा कालव्याच्या शेजारी असलेल्या बाळासाहेब बबन घंगाळे यांच्या शेतात पिंजरा लावला होता.