

AI-Generated Tiger Photo Causes Panic in Junnar
Sakal
पिंपळवंडी : जुन्नर तालुक्यात पट्टेरी वाघ आढळल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर टाकलेल्या छायाचित्रात पट्टेरी वाघ शेतात उभा असल्याचे दिसत आहे. दरम्यान, हे छायाचित्र ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता)चे असल्याचे स्पष्ट झाले आहे.