esakal | पुण्यातील नवले पुलावर आत्महत्येचा प्रयत्न; सिंहगड रस्ता पोलिसांनी वाचवला महिलेचा जीव
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

सिंहगड पोलिसांनी आज आत्महत्या करणाऱ्या एका महिलेचा जीव वाचवला आहे.

पुण्यातील नवले पुलावर आत्महत्येचा प्रयत्न; सिंहगड रस्ता पोलिसांनी वाचवला महिलेचा जीव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धायरी : सिंहगड पोलिसांनी आज आत्महत्या करणाऱ्या एका महिलेचा जीव वाचवला आहे. ही महिला नवले पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. सिंहगड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी नवले पुलाखाली नाकाबंदी कारवाई करत होते. तेंव्हाच रात्री आठ-साडेआठच्या सुमारास २२ वार्षीय महिला आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे एका नागरिकाने नवले पुलावरून ओरडून खाली नाकाबंदी  करत असणाऱ्या पोलीसांना सांगितले. लगेचच त्या ठिकाणी पोहोचणे शक्य नव्हते. परंतु त्यावेळी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे व पोलिस हवालदार प्रशांत काकडे यांनी रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वराची मदत घेतली. त्यांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून महामार्गावर उलट्या दिशेने जाऊन काही वेळातच महिलेचा जीव वाचविला.

हेही वाचा - Corona Update: रुग्णसंख्येत उतार; राज्यात आज 155 रुग्णांचा मृत्यू

पोलिसांच्या तत्परतेने एका महिलेचा जीव वाचला आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. परिसरातील नागरिकांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. प्राथमिक माहिती नुसार, आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण प्रेमप्रकरणातून असल्याचे समोर आले आहे. या महिलेची पुढील चौकशी सिंहगड पोलीस करत आहे.

loading image
go to top