

Pune CCTV Misuse Case: Shop Owner Arrested for Filming Woman in Store Room
esakal
Pune CCTV Misuse Case: पुण्यातील कामशेत परिसरात एका कपड्यांच्या दुकानात घडलेल्या घटनेने स्थानिक स्तरावर मोठी खळबळ निर्माण केली आहे. दुकानातील स्टोअर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असतानाही तेथे कपडे बदलण्यासाठी पाठवलेल्या महिलेचे जाणीवपूर्वक चित्रीकरण करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकारात दुकान मालकाने महिलेच्या गोपनीयतेचा भंग केला आणि नंतर तिला धमकी देखील दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. कामशेत पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.