Kasaba Vidhansabha Byelection : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची शाळा

कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या कार्य अहवाल आणि जाहीरनाम्याचे प्रकाशन केले.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal

पुणे - कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी काही दिवस शिल्लक असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शक्ती केंद्रप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत शेवटच्या टप्प्यात कसा प्रचार करावा यावर शाळा घेतली. आपला मतदार संवेदनशील आहे, त्याची भेट झाली तरी, स्लीप दिली नाही तर तो मतदानाला येणार नाही. त्यामुळे थेट प्रत्येक मतदारांशी संपर्क साधा, त्यांच्याशी संवाद साधा, केंद्र व राज्य सरकार कल्याणकारी योजना समजून सांगा, कसब्यात विजय आपलाच आहे, असे सांगत कार्यकर्त्यांना बळ दिले.

कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या कार्य अहवाल आणि जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. त्यानंतर त्यांनी मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रभारी व माजी नगरसेवकांनी निवडणुकीत केलेल्या कामाचा आढावा घेतला. पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान आलेले अनुभव देखील फडणवीस यांना सांगितले. यावेळी हेमंत रासने, खासदार धनंजय महाडीक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कूल, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, कोणतीही निवडणुकी चुरशीचीच असते. आपण अजूनही सर्व घरापर्यंत पोचलेले नाहीत, प्रत्येक मतदाराच्या घरी पोहोचलो तरच बूथवर नियंत्रण येते. केंद्रात व राज्यात आपली सत्ता असल्याने भाजपचा उमेदवार निवडून आला तर मतदारसंघाला जास्त निधी मिळेल हे समजून सांगा. सरकारच्या योजनांमुळे गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला महिलांच्या मिळणाऱ्या मतामधली टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे हा आपल्या हक्काचा मतदार मतदानासाठी बाहेर काढण्याचे प्रयत्न करा.

२२ ते २५ फेब्रुवारीचा कालावधी महत्त्वाचा आहे. या मतदारसंघात आपण कधीही निवडणूक हरलेलो नाहीत, त्यामुळे आपली येथे ताकद आहे, फक्त तिचा पूर्ण क्षमतेने त्याचा वापर करा. निवडणुकीत कमी मतदान झाले तर त्याचा फटका आपल्याला बसू शकतो.

विरोधकांकडून वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. पण हे मुद्दे प्रचारात टिकले नाहीत. त्यामुळे आपण सतर्क राहून घरोघरी जाऊन प्रचार करावा, असे फडणवीस यांनी सांगितले.

खडकवासल्याचे दिले उदाहरण

खडकवासला विधानसभा मतदारसंघात पोट निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराची हवा होती, तोच जिंकणार असे सांगितले जात होते. पण येथे भाजपची यंत्रणा शांतपणे काम करत होती आणि आपला विजय झाला. अशी आठवण फडणवीस यांनी सांगत कसब्यात आपली ताकद आहे, शांतपणे काम करून घेऊन विजय मिळवा,असेही फडणवीस यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com