
Kasba Ganpati Pune: पुणे शहराच्या मुळाशी असलेली कसबा पेठ ही केवळ एक वस्ती नाही, तर स्वराज्याच्या स्वप्नाचा पाया घालणारी पवित्र भूमी आहे. याच कसबा पेठेत वसलेला कसबा गणपती हा पुण्याचा मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखला जातो. या गणपतीचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या माता जिजाऊंशी असलेले अतुट नाते आजही पुणेकरांच्या मनात गौरवाने स्मरणात आहे.