Kashi Yatra : पुण्यातून करा ‘दिव्य काशी यात्रा’; जगन्नाथ पुरी, गया, वाराणसीला द्या भेटी

रेल्वे मंत्रालयाने सामान्य प्रवाशांना कमी दरात, सुरक्षितपणे धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी विविध यात्रांचे आयोजन केले आहे.
Railway
Railwayesakal
Summary

रेल्वे मंत्रालयाने सामान्य प्रवाशांना कमी दरात, सुरक्षितपणे धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी विविध यात्रांचे आयोजन केले आहे.

पुणे - रेल्वे मंत्रालयाने सामान्य प्रवाशांना कमी दरात, सुरक्षितपणे धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी विविध यात्रांचे आयोजन केले आहे. यापैकी पुण्याहून जगन्नाथ पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या स्थळांना भेटी देण्यासाठी ‘भारत गौरव पर्यटक रेल्वे’ सुरू होत आहे. २८ एप्रिलला सकाळी १० च्या सुमारास ही रेल्वे पुण्याहून सुटेल. या वेळी स्थानकावर विशेष समारंभाचे आयोजन केले आहे. पुण्याहून सुरू होणारी ही पहिली ‘भारत गौरव यात्रा’ रेल्वे आहे.

रेल्वे मंत्रालयाने ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत २८ एप्रिलला पुण्यातून ‘भारत गौरव पर्यटक रेल्वे’ सोडण्यात येणार आहे. यात प्रवाशांना जगन्नाथ पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ही विशेष रेल्वे सुरू केली आहे. यासाठी रेल्वे मंत्रालय व आयआरसीटीसीच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार आहे.

प्रवाशांना मिळतील या सुविधा

  • रेल्वेतच जेवण्याची व्यवस्था

  • राहण्यासाठी हॉटेलची सोय

  • स्थानिक स्थळांची माहिती मिळणार

  • सोबतीला गाइड

  • हॉटेल ते रेल्वे स्थानक व हॉटेल ते स्थानिक स्थळांसाठी वाहनाची सोय

  • जे पॅकेज असेल त्यातच याचे शुल्क आकारले असल्याने प्रवाशांना वेगळे शुल्क देण्याची गरज नाही

तीन पॅकेज : (सर्व दर रुपयांत प्रतिव्यक्ती आहेत)

  • १५,९०० स्लीपर क्लास :

  • २७,९०० थ्री टियर वातानुकूलित

  • ३३,३०० टू टियर वातानुकूलित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com