पुणे : मोबाईल दुकान फोडून तीन लाखांची चोरी; सीसीटीव्हीत कैद

खडकवासला येथील मुख्य रस्त्यावरील घटना
Pune Khadakwasla road Mobile shop theft of 3lakh CCTV Captured
Pune Khadakwasla road Mobile shop theft of 3lakh CCTV Capturedsakal

किरकटवाडी : खडकवासला गावातील मुख्य रस्त्याला लागून असलेले सक्सेस मोबाईल शॉपी हे दुकान फोडून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल चोरण्यात आला आहे. दुकानाचे शटर तोडून मोबाईलचे बॉक्स पोत्यात भरून नेतानाची ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या दुकानात मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिक चिंता व्यक्त करत आहेत.

सकाळी स्थानिक नागरिकांनी दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती दुकान मालक लोकेश चरवड यांना दिली. चरवड यांनी तातडीने दुकानात येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक चोर मध्यरात्री अडीचच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून आत शिरुन महागडे मोबाईल पोत्यात भरताना स्पष्ट दिसत होता. चरवड यांनी याबाबत हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून प्रभारी अधिकारी तेगबीरसिंह संधु यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.

केवळ महागड्या मोबाईलची चोरी...... चरवड यांनी दुकानात मोबाईल व इतर साहित्य मिळून पाच ते सात लाखांचा माल भरलेला होता. चोराने यातील केवळ महागडे मोबाईल चोरले आहेत. अत्यंत सफाईदारपणे दुकानाचे शटर उचकटून चोरटा दुकानात शिरताना आणि मोबाईल चोरताना दिसत आहे. यावरून हा सराईत चोर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चोरीच्या घटनांमध्ये वाढ..... मागील काही दिवसांपासून हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक व व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीसांनी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com