IAF Helicopter Emergency Landing : एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरचं बारामतीजवळ इमर्जन्सी लँडिंग

बारामती खंडज गावामध्ये अचानकपणे हेलिकॉप्टरचे लँडिंग झाल्याची माहिती
Emergency helicopter landing
Emergency helicopter landingsakal

माळेगाव : बारामती तालुक्यातील खंडज- निरावागज रोडच्या उजव्या बाजूस हनुमंत ज्ञानदेव आटोळे यांच्या शेतात आज सकाळी दहा वाजता अचानकपणे हेलिकॉप्टरचे लँडिंग झाले.  तांत्रिक बिघाड झाल्याने इंडियन एअर फोर्सचे चेतक हेलिकॉप्टर महिला पायलट गायत्री यांना इमर्जन्सी लँडिंग करणे गरजेचे पडले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट सह चार व्यक्तींचा समावेश होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचार यांनी दिली. 

दरम्यान,।बारामती खंडज गावामध्ये अचानकपणे हेलिकॉप्टरचे लँडिंग झाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या पार्श्वभूमीवर माळेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन सदर हेलिकॉप्टर, पायलेट व त्यांच्या इतर साथीदारांना सुरक्षितता पुरवली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन प्राप्त स्थितीची पाहणी केली. दरम्यानच्या कालावधीत इंडियन एअर फोर्स चे दुसरे हेलिकॉप्टर मदतीसाठी घटनास्थळी आले असून युद्ध पातळीवर नादुरुस्त हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com