

Khasdar Krida Mahotsav
Sakal
पुणे : ‘‘खासदार क्रीडा महोत्सवात सहभागी झालेल्या खेळाडूंच्या आई-वडिलांचे मी आभार मानतो. कारण की त्यांनी मुलांना खेळण्यासाठी बाहेर पाठवले. ‘सकाळी लवकर उठा आणि रात्री लवकर झोपा. नाहीतर तुम्ही घुबड व्हाल’, असे माझे वडील मला नेहमी सांगायचे. अनेक मुले मैदानी खेळ न खेळता मोबाईलवर गेम खेळतात. त्यांनी अशा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. सर्वात महत्त्वाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर खेळ, व्यायाम आवश्यक आहे. यंदा ४४ हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. पुढीलवर्षी एक लाख विद्यार्थी सहभागी झाले पाहिजेत,’’ असे आवाहन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अक्षय कुमार यांनी केले.