Pune : खेलो इंडिया वुमेन्स किकबॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या स्मिता वाल्हेकरचा सांगवीत सत्कार

स्मिता वाल्हेकर ही इक्बाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
pune
punesakal

रमेश मोरे

जुनी सांगवी - वाल्हेकरवाडी येथील स्मिता वाल्हेकर स्पोर्टस ॲकॅडमीची किक बॉक्सिंग खेळाडू स्मिता वाल्हेकर हिचा सितो रियो कराटे डु अँन्ड किक बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला.

स्मिता वाल्हेकर ही इक्बाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिने पॉईंट फाईट प्रकारात ६५ किलो वजनी गटात औरंगाबादच्या अश्विनी लोहकरे ह्या खेळाडूचा पराभव करत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.या यशाबद्दल तिचा अर्जून पुरस्कार विजेते बॉक्सिंग खेळाडू मनोज पिंगळे, आंतरराष्ट्रिय क्रीडा संघटक सुनील साठे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्मिता वाल्हेकर ही आंतरराष्ट्रीय खेळाडू असून तीने स्पेन, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया अश्या वेगवेगळ्या देशातून प्रशिक्षण घेतले आहे. त्याचप्रमाणे तिने आता पर्यंत बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या आहेत.

पुणे केंद्र शासनाच्या खेलो इंडिया या मोहिमे अंतर्गत अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स किकबॉक्सिंग लिग २०२३ या स्पर्धेचे पुण्यात खराडी येथील कै. विठोबा पठारे स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये घेण्यात आल्या. याप्रसंगी स्पोर्टस ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे निरीक्षक व कुस्तीचे राष्ट्रीय पंच अमरसिंग निंबाळकर,

बीजेपी युवा मोर्चाचे जनरल सेक्रेटरी सुरेंद्र पठारे, उद्योगपती सनी सांकला, समाजसेविका रीमा सेन, धीरज वाघमारे व पॉवरलिफ्टर खेळाडू सुप्रिया सुपेकर, स्पर्धेचे आयोजक महाराष्ट्र किकबॉक्सिंग स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार आदि मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धामध्ये राज्यातील ३३ जिल्हातून सुमारे ९५० खेळाडूंनी भाग घेतला. राज्यपातळीवरील या स्पर्धेतून देश पातळीवर खेळाडूंची निवड होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com