esakal | पुणे : आचाऱ्याचे अपहरण करीत खंडणीची मागणी, तिघांना बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

 पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : आचाऱ्याचे अपहरण करीत खंडणीची मागणी, तिघांना बेड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कंपन्यांमध्ये कॅन्टीन चालविणाऱ्या व्यावसायिकाकडील आचाऱ्याचे (कुक) अपहरण करुन तिघांनी त्याच्या मालकाकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हि घटना शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास खराडी बाह्यवळण परिसरात घडली. चंदननगर पोलिसांनी तिघांना तत्काळ बेड्या ठोकल्या.

मुकेश मनोज जाधव (वय 21, रा.नागपाल रोड, खराडी), मनोहर काशीराम जाधव (वय 23. रा.शिरुर) व विनोद चव्हाण (रा.चंदननगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर विश्‍वजीत पाल असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गगन अशोक तलवार (वय 21, रा.खराडी) यांनी चंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध अपहरण व खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तलवार हे नगर रस्त्यावरील बेकर कंपनीसह अन्य काही कंपन्यांमध्ये कॅन्टीन चालवितात. त्यांच्याकडे मागील काही वर्षांपासून पाल हा आचारी म्हणून काम करीत आहे. पाल नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी तलवार यांच्या कॅन्टीनमध्ये जेवण बनवून झाल्यानंतर दुचाकीवरुन त्याच्या घरी जात होता. त्यावेळी त्यासा खराडी बाह्यवळण येथे तिघांनी अडवून मारहाण केली. पाल यास वाटले गाडीचा धक्का लागल्यामुळे मारहाण केली असेल, त्यानंतर मात्र तिघांनीही त्यास छोट्या टेम्पोमध्ये टाकून चंदननगरमधील जंगलात नेले.

हेही वाचा: 'मंदिरं बंद आहेत, मग देव कुठे आहे?, तर देव...'

तेथे टेम्पोचे पडदे लावून त्यास आणखी जबर मारहाण करून त्याच्याकडे पैशांची मागणी केले. त्याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी, त्यास त्याच्या मालकाकडे पैशांची मागणी करण्यास सांगितले. त्याने मालकास फोन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, मात्र त्याने पैसे पाठविण्यासाठी स्वतःचा गुगल पे क्रमांक दिला नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच्या मालकास फोन करून "आम्ही तुझ्या जीवाचे बरेवाईट करणार आहोत', असे सांगण्यास सांगितले. मालकास हा प्रकार खोटा वाटला, त्यानंतर त्यांनी पालचा शोध घेतला. तेव्हा त्यांना रस्त्याच्याकडेला त्याची दुचाकी पडलेली दिसली. तेथील नागरीकांनी पाल यास तिघांनी टेम्पोमध्ये घालून नेल्याचे सांगितल्यानंतर मालक तलवार यालनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांच्या सुचनेनुसार, तलवार यांनी आरोपीशी मोबाईलद्वारे संवाद सुरू ठेवला. त्यानंतर तांत्रिक माहितीद्वारे पोलिसांनी जंगलात शोध घेऊन पालची सुटका करीत तिघांनाही बेड्या ठोकल्या.

loading image
go to top