Pune : दौंड येथील हत्येतील मृतदेह बाहेर काढण्यास हडपसरच्या टाक पितापुत्रांची मदत

पत्नीचा खून करून बापानेच आपल्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून स्वतः ही आत्महत्या
 डॉ. बच्चूसिंग व आझादसिंग टाक
डॉ. बच्चूसिंग व आझादसिंग टाकsakal

हडपसर : पत्नीचा खून करून बापानेच आपल्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून स्वतः ही आत्महत्या केल्याची घटना काल दौंड येथे उघडकीस आली. या चिमुकल्यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी हडपसर येथील डॉ. बच्चूसिंग व आझादसिंग टाक या पितापुत्रांची मदत घेण्यात आली.

 डॉ. बच्चूसिंग व आझादसिंग टाक
Sambhaji Nagar Crime news : मुलीने प्रसंगावधान राखत पळ काढला अन् ; पालकांनी धरून दिला चोप

वरवंड (ता. दौंड) येथे काल (ता. २३) दिवेकर कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले. त्यातील दोन चिमुकल्यांचे मृतदेह विहिरीत असल्याचे समजले. यवत पोलिसांनी हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी टाक पितापुत्रांची मदत घेतली. रात्री अकरा वाजता दोरीच्या साह्याने विहिरीत उतरून तळाशी असलेले चिमुकल्यांचे मृतदेह त्यांनी बाहेर काढले. वीरेंद्रसिंग टाक, सूरज काची व शुभम झगडे यांची या कामात मदत झाली.

 डॉ. बच्चूसिंग व आझादसिंग टाक
Crime news : बाळाची विक्री करण्याचा घाट हाणून पाडला

हडपसर गाडीतळ येथील कालव्यालगत शिकलकर वस्तीमध्ये टाक कुटुंब राहत आहे. लहानपणापासून डॉ. बच्चूसिंग टाक यांनी कालव्यात पोहण्याचे कसब प्राप्त केले आहे. कालव्यात वाहून येणारे मृतदेह काढण्यासाठी ते मदत करीत होते. हळूहळू त्यांनी यामध्ये कसबच निर्माण केले.

कालव्यात बुडणाऱ्या अनेक नागरिकांना त्यांनी जीवदान दिले आहे. तर वरून वाहून येणारे अनेक मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाला वेळोवेळी मदत केली आहे. दरम्यान, त्यांचा मुलगा आझादसिंग हाही वडिलांकडून प्रशिक्षण घेत या कामात पारंगत झाला आहे. आजपर्यंत या पितापुत्रांनी विविध घटनात सुमारे चार हजारांवर मृतदेह व बुडणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले आहे. याशिवाय परिसरातील रस्ते व रेल्वे अपघातातील जखमी व मृतदेह सोडविण्याचे कामही त्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com