Pune : बहुजनांचा उद्धार करणारा राजा, शाहू महाराज : राहुल सोलापूरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहुजनांचा उद्धार करणारा राजा, शाहू महाराज : राहुल सोलापूरकर

बहुजनांचा उद्धार करणारा राजा, शाहू महाराज : राहुल सोलापूरकर

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

पुणे (तळेगाव ढमढेरे) : राजर्षी शाहू महाराज हे सर्वसामान्यांच्या आयुष्याला आकार देणारे, पुरोगामी विचारांचे, निर्णयक्षमता असलेले, भरकटलेल्यांना किनारा दाखविणारे आणि बहुजनांचा उद्धार करणारे सर्वमान्य राजे होते असे मत सिने अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.कोंढापुरी (ता.शिरूर) येथे आयोजित केलेल्या"राजर्षी शाहू" या विषयावरील व्यख्यानात श्री सोलापूरकर बोलत होते. येथील विद्या निकेतन प्रशालेत पुणे नगर वाचन मंदिर व कोंढापुरी ग्रामविकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व्यख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राहुल सोलापूरकर म्हणाले की, शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते.त्यांनी केलेले पाण्याचे नियोजन भारतासह जगाला लाभदायी ठरले आहे. त्यांच्यामुळेच कोयनेला महाराष्ट्राची जलवाहिनी म्हटले जाते. त्यांच्याकडे वाचन व निर्णयक्षमता दांडगी होती. त्यांनी कुस्ती क्षेत्राला जागतिक उंची मिळवून दिली. साहित्य, कला, नाटक, शिक्षण, प्रशासन, शेती, उद्योग, व्यापार आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करून सर्वसामान्यांना न्याय दिला. पुढारलेला राजा म्हणून इंग्रजांनी त्यांना संबोधले होते. शाहू महाराजांनी अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी कार्य करून बहुजनांचा उद्धार केला असल्याचे सांगितले, सुमारे दीड तासाच्या व्यख्यानात शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग व उदाहरणे सोलापूरकर यांनी सांगून प्रेक्षकांची मने जिंकली.

कोरोना योध्यांचा सन्मान :

यावेळी कोरोनाकाळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा आरोग्य विभाग प्रमुख संपत फराटे,

व तालुका अध्यक्ष देवेंद्र सासवडे यांचा तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दै. सकाळचे बातमीदार प्रा. नागनाथ शिंगाडे, प्रा. संजय देशमुख, प्रमोल कुसेकर यांचा कोरोनायोद्धा पुरस्कार देऊन श्री सोलापूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला."

हेही वाचा: सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल

यावेळी कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय गायकवाड, पुणे नगर वाचन मंदीरचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, सरपंच संदीप डोमाळे, माजी सरपंच स्वप्नील गायकवाड, उद्योजक विनय गायकवाड, संदीप लवांडे, राहुल दिघे, नितीन गायकवाड, रमेश टाकळकर, अनिता माने, प्राचार्य पांडुरंग दौंडकर, वैभव गायकवाड, सुनील लवांडे, सोमनाथ गायकवाड, भगवान गायकवाड, पोलीस पाटील राजेश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

loading image
go to top