Koregaon Park Accident Pune
esakal
पुणे, ता. २ : भरधाव मोटारीने मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळ रविवारी (ता. २) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. ऋत्विक ऊर्फ ओम विनायक भंडारी (वय २३, रा. पिंपरी), यश प्रसाद भंडारी (वय २३, रा. थेरगाव, पिंपरी) आणि खुशवंत किशोर टेकवानी (वय १९, मूळ रा. बीड) अशी मृत तरुणांची नावे आहेत.