Pune : कोथरुड मध्ये ठिकठिकाणी ड्रेनेज तुंबले पादचा-यांना मलयुक्ता पाण्याचे घडतेय गंदा स्नान

पौडरस्त्यावरील राजा श्री शिवराय प्रतिष्ठान भुयारी मार्गालगत ड्रेनेजमधून मलयुक्त पाणी गेले सात दिवस वहात आहे.
ड्रेनेजमधून मलयुक्त पाणी गेले सात दिवस वहात आहे.
ड्रेनेजमधून मलयुक्त पाणी गेले सात दिवस वहात आहे.sakal

कोथरुड : कोथरुड मध्ये ठिकठिकाणी चेंबर तुंबल्यामुळे रस्त्यावर मलयुक्त पाणी वहात आहे. या पाण्यातून वाहने गेल्यावर उडालेले पाणी अंगावर आल्याने लोकांना मलयुक्त पाण्याचे गंदा स्नान घडत आहे. त्यामुळे येथे वाहनचालक व पादचारी यांची भांडणे वाढली आहेत.

पौडरस्त्यावरील राजा श्री शिवराय प्रतिष्ठान भुयारी मार्गालगत ड्रेनेजमधून मलयुक्त पाणी गेले सात दिवस वहात आहे. जयभवानीनगर येथे मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. वाहने या पाण्यातून गेल्यावर ते उडते. या ठिकाणी चालण्यासाठी पदपथ उपलब्ध नसल्याने पादचा-यांना अशाच पाण्यातून वाट काढावी लागते.

किष्कींदानगर पांचाळ चाळ येथील लोकांनी ड्रेनेजमधून काढलेला गाळ आणि राडारोडा काढणे आणि परिसरातील काँक्रिटीकरण करणेबाबत सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्याकडे जानू वरक, अनिल तोंडे, दिनेश डहाळे आणि प्रणिता वरक यांनी मागणी केली आहे.

जयभवानीनगर मधील दिपाली संतोष डोख यांनी सांगितले की, अनेक दिवस रस्त्यावर पाणी वहात असूनही हे पाणी रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. पौडफाटा येथे सुध्दा दशभुजा गणपती चौकात मुख्य रस्त्यावर पाणी वहात असते. कामावर वा कार्यक्रमानिमित्त बाहेर निघालेल्यांच्या अंगावर घाण पाणी पडल्यावर त्यांची काय अवस्था होत असेल याचा विचार प्रशासनाने करावा. अन्यथा लोक हे पाणी घेवून अधिका-यांच्या कार्यालयात येतील.

सुतारदरा येथील शिवसाई मित्र मंडळ चाळ क्रमांक १९ , शिवकल्याण मंडळ चाळ क्रमांक १३/४ आणि १७ अशा विविध ठिकाणांहून ड्रेनेज लाईनमधून मैलायुक्त सांडपाणी वाहत आहेत. यासंदर्भात राजू फाले, राजेंद्र शेळके आणि अक्षय जोरी यांनी तक्रार केली आहे. रामबाग कॉलनीतील चैतन्य हेल्थ क्लबसमोर ड्रेनेजमधून सांडपाणी वाहत असून पौड रोडवर मैलायुक्त सांडपाणी येत आहे.

जयभवानीनगर मधील हरिभाऊ सणस म्हणाले की, कोथरुड मध्ये जागोजागी चेंबर तुंबून रस्त्यावर मलयुक्त पाणी वहात आहे. परंतु त्यावर उपाय योजना करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसते. अधिका-यांकडे वारंवार तक्रार करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने त्यांचेही याबाबत लक्ष नाही. आता लोकांना रस्ता रोको करावा लागेल.

कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त केदार वझे म्हणाले की, पौडरस्त्यावरील चेंबर साफ करण्याचे काम सुरु आहे. त्यामध्ये दगड, माती मोठ्या प्रमाणात आहे. पावसामुळे डोंगर उतारावरील वस्तीत असलेल्या चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात दगड माती घुसले. पौडरस्त्यावर चेंबर वळतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गाळ, दगड सापडत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com